आपला जिल्हा

नागरिकांनो काळजी घ्या ! कोरोना हातपाय पसरतोय, पुन्हा 44 रुग्ण सापडले

बीड — कोरोना संसर्गाने बीड जिल्ह्यात वेगाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. सरकारी नियमांचे पालन करणे आता आणखी आवश्यक बनला आहे. मंगळवारी मध्यरात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात पुन्हा 44 रुग्ण नव्याने सापडले आहेत यामध्ये तब्बल 23 रुग्ण बीड तालुक्यातील आहेत.
सोमवारी मध्यरात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरात तब्बल पन्नास रुग्णांची भर पडली होती. मंगळवारी मध्यरात्री देखील आणखी 44 रुग्णांची भर पडल्यामुळे आणखी चिंतेत वाढ झाली आहे. बीड परळी याबरोबरच इतर ठिकाणी कंटेनमेंट झोन च्या माध्यमातून संचारबंदी लागू असताना देखील जनता काळजी घेत नसल्याचे हे परिणाम असल्याचे बोलले जात आहे. आज पहाटेच्या अहवालानुसार,बीड तालुक्यात 23, गेवराई 8, परळी – 5, केज – 3, शिरूर तालुक्यात 2 तर अंबाजोगाई, पाटोदा व माजलगाव तालुक्यात प्रत्येकी 1 असे एकूण 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून सर्वांवर कोव्हीड केअर सेंटर व उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या 433 वर जाऊन पोहोचली आहे यापैकी बारा रुग्न जिल्ह्याबाहेर उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या आता 213 वर जाऊन पोहोचली आहे.दरम्यान आरोग्य विभागाकडून हे रुग्ण नेमके कोणत्या भागातील आहेत याची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.शिवाय किती रुग्णांचे दररोज स्वॅब तपासणीला पाठवले जात आहेत, याऐवजी थेट किती अहवाल पॉझिटिव्ह आहेत हे सांगितले जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close