आपला जिल्हा

ठाकरे साहेब स्वत:च्या जागेत काय चालतं याची माहिती नसलेले जिल्हा प्रमुख जिल्ह्याच काय भलं करणार?

बीड — नव्या उमेदीच्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर भगवी पताका देत जनहितासोबतच पक्ष वाढीची जबाबदारी सोपवत जिल्हा प्रमुख पदाची माळ गळ्यात टाकली गेली. मात्र शिवसेनेच्या या ध्येयधोरणांची कुंडलीच बदलून टाकली गेली.ज्यांना स्वतःच्या मालकीच्या जागेत जुगार आड्डे चालू असल्याची माहिती होत नाही त्यांना सर्वसामान्यांच्या समस्याची माहिती काय होणार व ते त्या काय सोडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. किरायाने दिलेल्या जागेत काय चालते याची जबाबदारी मालकाची नसते काय ? किरायादाराने अवैध धंदे सुरू ठेवले तरी त्याकडे दुर्लक्ष करणे ही मूकसंमती नाही काय असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

शिवसेना एकमेव पक्ष असा आहे की आमदार , खासदारांपेक्षा जास्त किंमत जिल्हाप्रमुखाला आहे. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आज पर्यंत सोडवले गेले‌. जिल्हाप्रमुख समाजातील सर्व घटकांवर त्यांच्या अडचणीवर लक्ष ठेवून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा.
त्यामुळे शिवसेना हा पक्ष घराघरात जाऊन पोहोचला. तळागाळातील व्यक्ती सुद्धा स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेताना त्याला गर्व वाटायचा. मात्र बीड जिल्ह्यात आता हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. जिल्हाप्रमुख पद हे जनतेच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी असते याचा विसर पडला असून या पदाची प्रतिष्ठा आता व्यक्तीची बटिक बनली आहे. पदाचा वापर फक्त आणि फक्त अवैध धंदे करत स्वतःची तुंबडी भरण्यासाठी केला जात असल्याचं दिसत आहे. दोन दिवसापूर्वी जिल्हाप्रमुखाच्या मालकीच्या जागेत जुगार अड्ड्यावर धाड पडली यावेळी 28 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कामी प्रतिष्ठा पणाला लावूनही फायदा न झाल्याने दुसऱ्या दिवशी ही जागा किरायाने दिली असल्यामुळे माझा या जुगार अड्ड्याशी संबंध नसल्याचा खुलासा केला अन् जबाबदारी जिल्हाप्रमुखाने झटकली या सर्व प्रकारात शिवसेनेची इज्जत पार धुळीला मिसळली गेली.
उद्धव ठाकरे साहेब ज्या जिल्हाप्रमुखाला स्वतःच्या मालकीच्या जागेत राजरोसपणे जुगार अड्डा किरायदार चालवीत असल्याची माहिती मिळत नाही. तो जिल्हाप्रमुख सर्वसामान्यांच्या अडचणींची माहिती कशी ठेवणार जिल्हा कुठल्या संकटातून जात आहे. याच भान अशी व्यक्ती कसं राखणार व जनतेला मदत काय करणार यातून आपला पक्ष कसा वाढणार व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीच काय होणार सत्ता आणि जिल्हाप्रमुख पद व्यक्ती पुरतच मर्यादित राहणार असेल तर जनता तुम्हाला डोक्यावर कशी घेणार असे एक ना अनेक प्रश्न सध्या जनतेतून विचारले जात आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close