डॉ राम ताटे यांची राज्यशास्त्र अभ्यास मंडळ सदस्यपदी सर्वाधिक मताने निवड.

बीड — माऊली विद्यापीठ संचलित महिला महाविद्यालय बीड येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राम प्रल्हाद ताटे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद निवडणूक 2022 मधील राज्यशास्त्र अभ्यास मंडळ प्राधिकरण निवडणुकीत ् प्राचार्य प्रो. डॉ. नवनाथ आगाव यांच्या मार्गदर्शनाखाली बीड, उस्मानाबाद औरंगाबाद, जालना या चार जिल्ह्यातून ही निवडणूक घेण्यात आली. यामध्ये एकूण 94 महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुखांचे या अभ्यास मंडळासाठी मतदान होते.. अभ्यास मंडळ निवडणुकीत एकूण सहा उमेदवार रिंगणात उभे होते. या निवडणुकीत पहिल्या पसंती क्रमांकाने सर्वाधिक 32 मते घेऊन डॉ. राम प्रल्हाद ताटे विजय झाले आहे.
याबद्दल माऊली विद्यापीठाचे अध्यक्ष माजी मंत्री अशोकराव शंकरराव पाटील, खा.सौ. रजनीताई अशोकराव पाटील व माऊली विद्यापीठाचे सचिव आदित्य दादा अशोकराव पाटील, माऊली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष नवनाथ राव थोटे आणि माऊली विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी. प्रतापराव मोरे, प्राचार्य डॉ. सविता शेटे, सरस्वती महाविद्यालय केज येथील प्राचार्य डॉ. गौतम पाटील, प्रमिलादेवी पाटील महाविद्यालय नेकनूर येथील प्राचार्य डॉ. दादासाहेब मोटे. प्राचार्य डॉ.वसंत सानप, प्राचार्य डॉ. नवनाथ आघाव, डॉ. तात्या पुरी, डॉ. उमाकांत वानखेडे, डॉ. महादेव मुंडे, डॉ. कालिदास चौधरी, डॉ. मोहम्मद खयूम ,डॉ.अंबादास बिराजदार, डॉ. निलेश शेरे, डॉ.नामानंद साठे ,डॉ. जगदीश देशमुख, डॉ शिवाजी दिवाण , प्रा. विठ्ठल शिंदे हिंगणीचे माजी सरपंच अंकुशराव गोरे,आदी चारही जिल्ह्यातील मित्र परिवारांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या..