क्राईम

बीड : ग्रामपंचायत निवडणुकीवरून सरपंचावर खूनी हल्ला

बीड — ग्रामपंचायत – निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर गावा-गावातील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. निवडणूकीच्या कारणावरून दोन गटात झालेल्या रक्तरंजित वादात सरपंचासह तीन जण जखमी झाल्याची घटना माळापुरी येथे घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

येथून जवळच असलेल्या माळापुरी येथे मंगळवारी रात्री सुमारास ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरून वाद झाला. यावेळी झालेल्या वादात नवनिर्वाचित सरपंच गट आणि पराभुत गट आमने सामने आले पराभुत गटातील सरपंचपदाच्या उमेदवार सलीमाबी दाऊद बेग वय55 वर्ष, त्यांचा मुलगा नझीम बेग दाऊद बेग वय 31 आणि हारूण इस्माईल पठाण वय 38 वर्ष या तिघांवर कुकरी आणि दांड्याने हल्ला झाला. या हल्यामध्ये तिघेही जखमी झाले तिघांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर समोरच्या गटातील नवनिर्वाचित सरपंच अशोक ढास हे देखील जखमी झाले असुन त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीसांनी तात्काळ धाव घेतल्याने तणाव निवळला. या प्रकरणी ग्रामस्थ बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता तक्रार दाखल न करून घेतल्याने, संतप्त ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button