क्राईम

भरधाव कार ऊसाच्या ट्रॉलीवर जाऊन धडकली;तीन जण जागीच ठार

अंबाजोगाई — उसाच्या ट्रॉली ला पाठीमागून भरधाव वेगातील कार धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरवड पाटीजवळ रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

बर्दापूर जवळील मोरवड पाटीजवळ अंबाजोगाईहून लातूर कडे भरता वेगात जात असलेली कार क्र. एम एच 44 यु 0647
ऊस वाहतूक करत असलेल्या ट्रॉलीला जाऊन धडकली. अपघात इतका भीषण होता की या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात परळीतील तीन जण घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी तिन्ही मृतदेह घेऊन जाण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत यातील मृतांची नाव समजू शकले नाहीत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button