आपला जिल्हा

कोरोनाची काळी छाया आणखी गडद, एकाच दिवसाचा सापडले 50 रुग्ण

बीड — कोरोना संकटाचे ढग बीड जिल्ह्यात गडद होताना दिसून येत आहेत. सोमवारी रात्री अकरा वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार 26 रुग्ण नव्याने सापडलेली आहेत. बीडमध्ये 16, गेवराई तीन, परळी पाच, अंबाजोगाई व आष्टीत प्रत्येकी रुग्ण सापडला आहे. वाढत्या रुग्ण संख्या मुळे जिल्हावासीयांना आता अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
आज आलेली आकडेवारी धक्कादायक आहे. सोमवारी सकाळी मिळालेल्या अहवालानुसार 24 रुग्ण सापडले होते. तर रात्री आलेल्या अहवालात 26 रुग्ण आढळून आले आहे.
आज आढळलेले रुग्ण असे

बीड –16
सटवाई मैदान सावतामाळी चौकात 15 वर्षीय मुलगा चंपावती नगर बीड मध्ये 60 वर्षीय महिला तसेच सुलतानपूर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेली 42 वर्षीय माळीवेस मधील महिला तसेच जिल्हा रुग्णालयातील 38 वर्षीय महेश कोरोना ची बाधा झाली आहे. तसेच एका खाजगी रुग्णालयातील दोन डॉक्टर सहित 11 कर्मचारी व या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा 19 वर्षीय नातेवाईक कोरोना बाधित आढळून आला आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये 21 वर्ष व 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे तर 22 वर्षीय ते 36 वर्षीय कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे ‌.

गेवराई — 3
शहरातील बोर्डे गल्लीत राहणारा छत्तीस वर्ष व गणेश नगर भागातील 60 वर्षीय व्यक्ती सुलतानपूर येथे पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेली 40 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळली आहे.

परळी — 5
जुने रेल्वे स्टेशन भागात पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे चार जण संक्रमित झाले आहे यामध्ये पाच वर्ष मुलगी 34 वर्षे महिला साठ वर्षाची महिला आत्ताच 37 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. इंजेगाव येथे 48 वर्षीय रुग्ण सापडला आहे

.
आंबेजोगाई –1
अंबाजोगाई मधील 25 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळली आहे.

आष्टी–1
तालुक्यातील धामणगाव येथे 37 वर्षीय पुरुष पॉझिटिव आढळून आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close