ट्रॅफिक मधील ‘मोती’ ने नियमांना “राख” फासून “राम” घालवला

बीड — बीडचा ट्रॅफिक विभाग नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. बेशिस्त वाहन धारकाला शिस्त लावण्याचं काम करताना त्यांना अडवून लायसन्स ची विचारणा केली जाते. नंबर प्लेट पाहिली जाते. कुठे उणीव झाली तर दंडही आकारला जातो. मात्र ट्रॅफिक पोलिसात इतके हिरे “मोती” आहेत की स्वतः मात्र विना नंबरच्या गाडीवर फिरत आहेत. त्यांनी नियमांना “राख” फासून कायद्यातला राम (प्राण) घालवल्याचं दिसू लागला आहे.
बीडचा ट्राफिक विभाग या ना त्या कारणाने नेहमीच वादात सापडला आहे. याच विभागातील कर्मचारी एखाद्याच्या गाडीला नंबर प्लेट नसेल तर दंड आकारतात. लायसन्स ची मागणी करतात. एखाद्या वाहनधारकाकडे लायसन्स नसेल, गाडीला नंबर प्लेट नसेल तर ही बाब कर्मचाऱ्यांसाठी पर्वणीचा काळ ठरते.हे करत असताना बहुतांश वेळा स्वतःचे खिशात भरण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. वाहनधारकाची होणारी लूट जनतेची डोकेदुखी बनला आहे. असं असलं तरी लोकांना नियमांचा दंडुका दाखवणारे ट्रॅफिक पोलीस मात्र स्वतः कायद्याला नियमांना हरताळ फासत असल्याचं दिसू लागला आहे. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोतीराम राख नावाचा पोलीस कर्मचारी लाल रंगाच्या “मेस्ट्रो” गाडीवर बसलेला आहे. या गाडीला दोन्ही बाजूंनी नंबर प्लेट अस्तित्वात नाही. विशेष म्हणजे वाहनधारकाची अडवणूक करून त्यांची लूट करण्यात या पोलीस कर्मचाऱ्यांचा कोणी हात धरू शकत नाही अशी ख्याती असल्याचं वाहनधारकात सांगितलं जातं हा पोलीस कर्मचारी ज्या गाडीवर बसला आहे ती गाडी नवी आहे असं मानलं तर या गाडीला टेम्पररी पासिंग देखील नाही. मग ही गाडी नेमकी कोणाची? चोरीची तर नसेल ना ? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी नियम पायदळी तुडवले तर चालतात का? मग एखाद्या वाहनधारकालाच अडवून त्रास का दिला जातो? त्याची लूट का केली जाते? आशा मुजोर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.