आपला जिल्हा

सोमवारी कोरोनाने घेतला तिघांचा बळी

बीड — जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या संसर्गाने मृतांची संख्या देखील वाढताना दिसून येत आहे.सोमवारी दिवसभरामध्ये तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या 17 वर पोहोचली आहे.
सुरुवातीला कोरोना पासून अलिप्त असलेला बीड जिल्हा आता मात्र या संकटाने पुरता हादरला आहे रुग्णांची संख्या साडेतीनशे च्या घरात गेली असून उपचारा दरम्यान मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. रविवारी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सोमवारी सुद्धा सकाळपासून तीन जणांना जीव गमवावा लागला. गेवराई तालुक्यातील 32 वर्षीय महिला रूग्ण दुसरा परळी तालुक्यातील सिरसाळा येथील शिक्षक औरंगाबाद येथे उपचार घेताना तर आता संध्याकाळी बार्शी नाक्यावरील 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता उपचारादरम्यान मृत पावलेल्या ची संख्या सतरा वर जाऊन पोहोचली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close