क्राईम

पाटोदा न प चा लाचखोर मुख्याधिकारी भोसले पैसे स्वीकारताना पकडला

बीड —  पाटोदा नगर पालिकेचे मुख्याधिकारी शशिकांत भोसले व त्याचा चालक प्रदीप वाघ या दोघांना साठ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले ही कारवाई सोमवारी (दि.20) सायंकाळच्या सुमारास केली आहे.
पाटोदा नगरपालिकेत स्वच्छता विभागातील थकित बिल काढण्यासाठी न पचे मुख्याधिकारी शशिकांत भोसले यांनी तक्रारदारास 60 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. सर्व प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी संध्याकाळी रचलेल्या सापळ्यात मुख्याधिकारी भोसले व त्याचा चालक प्रदिप वाघ यांना तक्रारदाराकडून साठ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून मुख्याधिकारी याच्या घराची झाडाझडती घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपूडे व त्यांच्या टीमने केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close