बीड जिल्हा हादरला! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; महिलेने काढले नग्न फोटो

माजलगांव — साल गड्याच्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री उघडकीस आली. ही घटना घडत असताना तेथे एक महिला देखील उपस्थित होती तिने पिडीतेचे लग्न फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तिघा जणांच्या मूसक्या आवळल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंठा तालुक्यातील एक कुटुंब सालगडी म्हणून दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतकऱ्याच्या शेतात रहात आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी आई-वडील दोघेही कामासाठी गेले.यावेळी घरात मुलगी एकटीच असल्याची संधी साधून बाळू उर्फ महादेव सुधाकर फपाळ याने मुलीला ओढत ऊसाच्या शेतात घेऊन गेला. तिथे आधी पासून हजर असलेले विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळआणि अक्षय अर्जुन फपाळ. या चौघांनी एकट्या मुलीच्या इज्जतीचे लचके तोडत आळीपाळीने सामुहिक अत्याचार केला. विशेष म्हणजे यावेळी घटनास्थळी एक महिला उपस्थित होती. तीने या असहाय्य मुलीला वाचवण्या ऐवजी मोबाईलमध्ये घडत असलेल्या घटनेचे फोटो घेत होती. याप्रकरणी पिडीत मुलीच्या तक्रारीवरून या महिलेसह पाच जणांवर बाल लैंगिक अत्याचार, ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस डॉ. धीरज कुमार बच्चू यांनी दिंद्रुड पोलीस ठाण्याला भेट दिली. दरम्यान पोलिसांनी अमोल प्रभाकर फपाळ, विजय दशरथ फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या तीन आरोपींना अटक केली असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.