कृषी व व्यापार

रोहित्र वाहतुकीची जबाबदारी महावितरणचीच – सहव्यवस्थापकीय  संचालक डॉ. मंगेश गोंदावले

शेतक—यांनी कंत्राटदार अथवा कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नये

औरंगाबाद —   रोहित्र वाहतुकीसाठी वाहन व्यवस्थेची तरतुद रोहित्र दुरूस्त करणा—या एजन्सी किंवा महावितरणकडे आहे. त्यामुळे नादुरूस्त किंवा दुरूस्त रोहित्रांच्या वाहतुकीसाठी शेतक—यांनी कंत्राटदाराशी किंवा कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन सहव्यवस्थापकीय  संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांंनी केले आहे.
सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. शेतीला सिंचनासाठी सुरळीत विघुत पुरवठयाची आवश्यकता असते. त्याद्रष्टिने महावितरण प्रयत्नशिल आहे. मंजूर भारापेक्षा अधिक विघुत भाराच्या वापरामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतक—यांनी प्रमाणित कॅपासिटर बसवून अंखडित वीज वापराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करून सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले की, ग्रामीण भागातून वीज बिलापोटी ग्राहकांकडून जमा करण्यात आलेल्या बिलांचा भरणा काही ठिकाणी महावितरणकडे तत्काळ होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. वीज कर्मचारी व वीज बिल भरणा केंद्रानी त्यांच्याकडे संकलीत झालेली बिले तत्काळ महावितरणकडे जमा करावी. ग्राहकांनीही वीज बिलापोटीचे व्यवहारही पावतीशिवाय करू नये.
अनधिकृत वीज वापर करीत असलेल्या कृषीपंप धारकास तसेच अधिक भार जसे की, तीन एचपी मंजूर असतांना पाच एचपीचा पंप वापरणे अशा कृषीपंपधारकांनी वीज पुरवठयासाठी किंवा अतिरिक्त भाराकरिता अर्ज करून नियमाने वीज जोडणी घ्यावी व वीज कायदा 2003 चे पालन करावे. कृषीपंपास एल अॅड टी, क्रॉम्टन,ग्रिव्हज, सुबोधन, कॅपको सारख्या आएसआय मानांकन असलेले कॅपासिटर बसविण्यात यावे. कॅपासिटर हा शेतक—यांच्या पंपाचे आणि रोहित्राचेही बिघाड टाळतो. त्यामुळे शेतीला अंखडित वीज पुरवठा करणे सोयीचे होणार आहे, असे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले.
अॅटोस्विचमुळे वीजपंप जळतात
अंखडित आणि सुरळित विघुत पुरवठयाचा लाभ घेण्यासाठी कृषीपंप धारकांनी त्यांच्या वीज पंपावर अॅटोस्विच बसवू नयेत. त्यामुळे कृषीपंप जळण्याची आणि रोहित्रही नादुरूस्त होण्याची शक्यता अधिक असते. रोहित्रावर असलेले अनधिकृत कृषीपंप व मंजुर भारापेक्षा  जास्त भार असलेले कृषीपंप काढून टाकावेत.
रोहित्र बिघाडल्यास येथे संपर्क साधा
कृषिपंपाना वीज पुरवठा करणारे वितरण रोहित्र अर्थात ट्रान्सफॉर्मर नादुरूस्त झाल्यास ते तत्काळ बदलण्यासाठी कंत्राटदार एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी रोहित्र नादुरूस्त झाले असेल त्यासंबंधित माहिती शेतकरी बांधवानी जवळच्या कार्यालयात किंवा चोवीस तास सुूरू असलेल्या 18002123435 / 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर घावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button