आपला जिल्हा

बीड शिवसेनेची कुंडलीच बदलली, ती सामान्यांसाठी न राहता जिल्हाप्रमुखाची बटिक बनली

बीड — सर्वसामान्यांच्या अडचणींत धावून जाणारा पक्ष म्हणून शिवसेनेने प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवले मात्र स्वाभिमानाची ज्योत पेटवणारा हा पक्ष आता पदाधिकाऱ्यांची बटीक झाल्याचे पाहावयास मिळत आहे. पूर्वी पक्षाचा जिल्हाप्रमुख हा सर्वेसर्वा असायचा आताच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाच्या ध्येय धोरणांची कुंडली बदलत तत्वांची

खांडे( ऻ )ळी केल्याचे पहावयास मिळत आहे. सत्तेचा फायदा सर्वसामान्यांना देत पक्ष वाढ करण्याऐवजी जिल्हा प्रमुख पद स्वतःची संपत्ती वाढवण्यासाठी करत असल्याचे काल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मारलेल्या छाप्यातून उघड झाले आहे. जिल्हाप्रमुखाच्या जागेत जुगार अड्डा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तिलांजली देण्याचा प्रकार आहे.

कोरोना महामारीचे संकट सध्या घोंगावत असल्यामुळे प्रशासनाचे सर्व लक्ष या प्रतिकूल परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्रित झाले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे जनतेला नियमांच्या कचाट्यात बांधत असताना दुसरीकडे मात्र त्यांचेच जिल्हाप्रमुख सर्व नियमांना कायद्यांना फाट्यावर मारत अवैद्य धंदे आपल्या पंटर मार्फत करत असल्याचे बीड जिल्ह्यात उघडकीस आले. यापूर्वी शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक पदाची लालसा न बाळगता निस्वार्थपणे जनतेच्या हाकेला ओ देत मदतीला धावून जायचा त्यामुळे प्रत्येक जण स्वतःला शिवसैनिक मानत पक्षवाढीसाठी काम करत असल्याच दिसायचं. परिणामी बीड जिल्ह्यात प्रत्येकाने प्रामाणिकपणाने काम केल्यामुळे शिवसेनेची पाळेमुळे खोलवर गेली. मात्र पूर्वीची माणसं आज शिवसेनेत राहिली नाही नवी माणसं पक्षात आली अन् त्यांनी पक्षाची कुंडलीच बदलून टाकली. सर्वसामान्यांच्या गळ्यात जबाबदारी ची माळ टाकून पक्षाची ध्येयधोरणे सांभाळत एक सामान्य दुसरा सामान्यांना न्याय देईल हे तत्व यावेळी देखील कायम ठेवले गेले. याचे परिणाम मात्र उलटे झाले. नव्या थडीच्या पक्षप्रमुखाने सर्व पक्षाचीतत्व कचऱ्याच्या डब्यात फेकत पदाचा उपयोग स्वतःची संपत्ती वाढवण्यासाठी सुरू केला असल्याचे दिसून येत आहे. स्वतःच्या मालकीच्या जागेत आपल्याच कार्यकर्त्यांमार्फत जुगार अड्डे, गुटखा तस्करी यासारखे उद्योग उभे केले. सामान्यांना लॉकडाउनच्या काळात आधाराची गरज असताना त्यांना काही प्रमाणात मदतीचे नाटक करून सर्व लक्ष या नंबर 2 च्या धंद्यावर केंद्रित केल्याचे दिसून आले. प्रमुखपदाला आजही प्रतिष्ठा असल्यामुळे तसेच सत्ताधारी पक्ष असल्यामुळे आपलं कोण काय वाकडं करू शकतं या अविर्भावात महामारीच्या संकट काळात देखील सर्व आलबेल चालू होतं. मात्र कोरोना रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे जनतेच्या आरोग्य धोक्यात आले आहे अशा अवस्थेत क्लबमधून सोशल डिस्टंसिंग, एकाच जागी गर्दी न करणे यासारख्या नियमांचे देखील पालन होत नाही. सर्वसामान्यांना आपण नियम कडक करत आहोत. याची जाणीव पोलीस अधीक्षकांना झाली आणि त्यांनी आपली सर्व टीम कामाला लावली. नंबर 2 च्या धंद्या विरोधात एक प्रकारचा शिवसंग्राम छेडत राजकीय नेत्याच्या जुगार अड्ड्यावर छापेमारी करत त्यांना मेटा कुटी ला आणावयास‌ सुरुवात केली . शिवसेनेच्या पक्षप्रमुखाची कुंडलीच बाहेर काढली. जालना रोड वर असलेल्या काकू नाना हॉस्पिटल परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारत अठ्ठावीस जणांना ताब्यात घेतले. ही जागा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या मालकीची असल्याचे उघड झाले‌ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे गुन्ह्यात त्याचा उल्लेख देखील आला आहे. या सर्व गोष्टीमुळे सामान्यांच्या मनात असलेले शिवसेनेचे स्थान मात्र कमी होताना दिसून येत आहे.शिवसेना आता या पक्षप्रमुख विरोधात काय कारवाई करतो की आश्रय देत अवैद्य धंदे सुरूच ठेवण्याची मुभा देतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close