क्राईम

मतदानासाठी गावी परतत असलेल्या मोटार सायकल स्वार तरुणाचा अपघातात मृत्यू

नेकनूर — ग्रामपंचायत निवडणुकीमुळे मतदानासाठी बाहेर जिल्ह्यात असलेली मंडळी गावाकडे परतत आहे. त्यातच मतदानासाठी औरंगाबाद येथून सारणी कडे दुचाकीवरून जात असलेल्या युवकाचा भरधाव कारने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना नेकनुर मांजरसुंबा रस्त्यावर गवारी जवळ घडली.

श्रीकृष्ण अनिल गायकवाड वय 35 वर्ष रा. आनंदगाव सारणी असं मृत तरुणाचं नाव आहे. औरंगाबाद येथे असलेला श्रीकृष्ण गायकवाड हा उद्या होणाऱ्या मतदानासाठी गावाकडे मोटार सायकल क्र. एम एच 20 सीएक्स 1102 ने जात होता. केज मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या गवारी जवळ आला असता समोरून आलेली भरधाव इनोव्हा कार क्र. एम एच 20 एल 7009 ने मोटार सायकल ला जोराची धडक दिली. घटना घडताच जखमी मोटार सायकल स्वार श्रीकृष्ण गायकवाड यास नागरिकांनी तातडीने नेकनुर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यास मृत घोषित केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button