क्राईम

जिल्हा प्रमुखाच्या पंटरच्या क्लबवर छापा; 28 जणांना घेतले ताब्यात

बीड — सत्तेचा जोर आणि जिल्ह्याच्या प्रमुख पदाचा तोरा याच्या जीवावर बगलबच्यांच्या मदतीने अवैद्य धंदे कोरोना महामारी च्या काळातदेखील सुरू होते. मात्र बीड पोलिसांनी या मुजोरीला प्रत्युत्तर देत पत्त्याच्या क्लबवर कारवाई करत वाघाची डरकाळी बंद करत अठ्ठावीस जणांना ताब्यात घेतले.

सत्ताधारी पक्षाच्या जिल्ह्याचे प्रमुखपदाचा फायदा घेत बगल बच्च्यांच्या माध्यमातून अनेक अवैध धंदे कोरोना महामारीच्या संकटात देखील सुरु ठेवले होते. जालना रोड वर असलेले काकू नाना हॉस्पिटल च्या पाठीमागील भागात पत्याचा क्लब सुरू असल्याची माहिती बीड शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख गजानन जाधव यांना मिळाली. माहिती मिळतात त्यांनी तात्काळ कारवाई करत या ठिकाणी छापा मारला यावेळी पोलिसांनी 28 जणांनां ताब्यात घेतले. रात्री उशिरा ही कारवाई केल्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत देखील पुढील कारवाई सुरू होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा पत्त्याचा क्लब सुभाष पाटील हा चालवत होता. पोलिसांनी यावेळी कारवाईत किती लाखाचा मुद्देमाल जप्त केला याची माहिती मात्र मिळू शकली नाही. ज्या जागेमध्ये हा क्लब सुरू होता त्या जागा मालकावर काय कारवाई होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.बीड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंद्या ची ‘कुंड’ली बदलली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close