आरोग्य व शिक्षण

शिवाजी विद्यापीठाचं महत्वपूर्ण संशोधन; फॅब्रिक स्प्रे कपड्यांनाच सुरक्षाकवच बनवून कोरोना पासून संरक्षण करणार

कोल्हापूर — हात विषाणू मुक्त करण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझर चा वापर केला जातो. मात्र कपड्यावर कोरोना चा विषाणू राहू शकतो. हा विषाणू नष्ट करण्यासाठी कपडे धुणे हाच पर्याय उपलब्ध आहे. मात्र शिवाजी विद्यापीठाने कपड्यांचा निर्जंतुकीकरण करण्यासाठी फॅब्रिक स्प्रे च संशोधन केला आहे. त्यामुळे आता कपडे निर्जंतुकीकरणाबरोबरच सुरक्षा कवच म्हणून याचा उपयोग होणार आहे.

बाहेरून आल्यानंतर प्रत्येक वेळी अंगावरचे कपडे धूणे कटकटीचे बनले आहे. मात्र शिवाजी विद्यापीठाने संशोधित केलेल्या या फॅब्रिक स्प्रे मुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे तंत्रज्ञान’ हे वापरावयास अत्यंत सुलभ व सोपे आहे. हा स्प्रे फक्त आपल्या कपड्यांवर फवारायचा आहे. यानंतर यातील निर्जंतुकीकरणाचं औषध कपड्यांवर वाळल्यानंतर पुढे ते कपडे धुवून टाकेपर्यंत आपल्याभोवती संरक्षक कवचाप्रमाणे काम करते. कपडे धुतल्यानंतर पुन्हा त्यावर हे फवारले की काम झाले. हे विषाणू कवच 99% कोरोनाविषाणू निष्क्रिय करण्याची क्षमता असल्याचा दावा करण्यात आला आहे.
विद्यापीठातील नॅनोसायन्स व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ. किरणकुमार शर्मा या संशोधकांसह या उत्पादनाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पुणे येथील इकोसायन्स इनोव्हेशन प्रा. लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत म्हेतर, संचालक अजय म्हेतर यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना भेटून या संशोधनबद्दल माहिती दिली. शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ नॅनोफॅब्रिक्सचे प्रा. किरणकुमार शर्मा यांनी प्रा. पी. एस. पाटील आणि डॉ. किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भातील संशोधन केले आहे.यामध्ये केवळ ‘सेंद्रिय कार्बोक्झिलिक अॅसिड’ची संयुगे आहेत. ती विषारी नाहीत, तर पर्यावरणपूरक आहेत, असा दाखला अमेरिकेतील पर्यावरण सुरक्षा एजन्सीने दिला आहे. त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यताही दिलेली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close