क्राईम

वाळू माफियांवर महसूल प्रशासनाचा कारवाईचा बडगा, 3 हायवा, 150 ब्रास वाळू जप्त

गेवराई — तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक होत असल्याची माहिती महसुल प्रशासनाला मिळताच तहसिलदार प्रशांत जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली अचानक धडक कारवाई करून जवळपास 150 ब्रास वाळू , तीन हायवा ताब्यात घेतल्याने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

महसुल प्रशासन कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन वाळू माफियांनी तालुक्यातील गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू केली होती. याला चाप बसवण्यासाठी तहसिलदार प्रशांत जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल प्रशासनाच्या वतीने पथक तयार करण्यात आले. या पथकात तिपाले, कुडके, गजानन देशमुख, मंडळ अधिकारी निशांत ठाकुर, तलाठी वाकडे, जे.ऊस.लेंडाळ, अनिल गायकवाड, व्ही.व्ही.आमलेकर, तलाठी राजेश राठोड यांचे पथक तयार करून मंगळवार दि 14 रोजी रात्री 2 वाळूचे टिप्पर अनधिकृत वाळू वाहतूक करताना शिरसमार्ग येथे पकडून तहसील कार्यालय गेवराई येथे लावण्यात आले. तसेच बुधवार दि‌.15 रोजी पहाटे एक रिकामा हायवा अनधिकृत वाळू वाहतुकीच्या संशयावरून तहसिल कार्यालयात लावला व नंबर नसल्याने पुढील कारवाई साठी RTO कार्यालयात वर्ग करण्यात आला. गुरुवार दि16 रोजी पहाटे SDPO गेवराई यांचे पथक श्री तिपाले, कुडके यांचे सह तहसीलदार प्रशांत जाधवर , तलाठी गजानन देशमुख यांचे संयुक्त पथकाने मौजे गुळज येथे अंदाजे 70 ब्रास वाळू साठा जप्त करून सदर वाळू विश्राम गृह गेवराई येथे आणण्यात आला. या प्रकारणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शुक्रवार दि.17 रोजी मौजे राक्षसभुवन येथे अंदाजे 24 ब्रास वाळू साठा जप्त करून विश्राम गृह गेवराई येथे आणण्यात आला सदर कारवाई मंडळ अधिकारी निशांत ठाकूर, तलाठी वाकडे एस एस यांनी केली. तसेच गंगावाडी येथे छापा मारून अंदाजे 30 ब्रास वाळू साठा जप्त करून विश्रामगृह गेवराई येथे आणण्यात येत आहे सदर कारवाई तहसीलदार प्रशांत जाधवर तलाठी जे एस लेंडाळ,अनिल गायकवाड यांनी केली. मौजे सांगम जळगाव येथे अंदाजे 150 ब्रास वाळू साठा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जवळपास 150 ब्रास व तीन हायवा पकडल्याने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close