1लाख 20 हजारांची लाच मागणारा वाहतूक नियंत्रक पैसे घेतांना एसीबीने पकडला

बीड — बीड आगारात सूरू असलेल्या चौकशीत महिला तक्रारदारास बडतर्फ न करता कर्तव्यावर परत घेण्यासाठी 1 लाख 20 हजारांची मागणी करण्यात आली.यापैकी 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाहतुक नियंत्रकास शुक्रवारी दि. 16 डिसेंबर रोजी दुपारी लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
किशोर अर्जुनराव जगदाळे वय 40 वर्ष वाहतुक नियंत्रक रा.प. बीड रा. स्वराज्य नगर ता.जि. बीड असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे विरुद्ध बीड आगार येथे सुरू असलेल्या चौकशीत तक्रारदार यांना बडतर्फ न करणे व कर्तव्यावर परत घेण्यासाठी वरिष्ठांशी बोलून मदत करण्यासाठी वाहतूक नियंत्रण किशोर जगदाळे याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष 1 लाख 20 हजार रुपये लाचेची मागणी केली त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 30 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या टिमने रंगेहाथ पकडले.ही कारवाई बीडच्या एसीबीने केली.