महाराष्ट्र

गेल्यावर्षी केली भरती यावर्षी गळती चार हजारांवर कर्मचाऱ्यांची  सेवा एसटी करणार खंडीत 

औरंगाबाद —  जनतेची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी महामंडळात गेल्यावर्षी सरळ सेवा भरतीने सेवेत सामावून घेतल्या गेलेल्या चार हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरती खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे खळबळ माजली आहे

कोरोना महामारीच्या संकटामुळे 23 मार्च पासून एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे लाल परीला एकवीसशे कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले आहे. आधीच फारशी नफ्यात नसलेली एसटी आणखीन डबघाईला आली आहे. मे महिन्यात आर्थिक कारणांमुळे कर्मचाऱ्यांना 50 टक्के वेतन दिले गेले. हे संकट नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर सुरुवातीला कोसळले आहे. गेल्यावर्षी 2019 मध्ये सरळ भरती सेवा प्रक्रियेद्वारे 8022 पदं भरण्यात येणार होती. त्यापैकी साडेचार हजार पदांची भरती करण्यात आली.पुन्हा वाहतूक सुरु होण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आसल्यामुळे सरळ सेवा भरतीने २०१९ मधील चालक तथा वाहक पदांवर नेमणुका देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात वाहतूक वाढली तर या कर्मचाऱ्यांना आवश्यकता असल्यास जेष्ठतेनुसार पुन्हा घेण्यात यावे, असे निर्देश उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहेत. एसटीच्या या निर्णयामुळे मात्र कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close