राजकीय

सौ.सुलभा जोगदंड यांचा विजय निश्चित;माझा लढा सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी — सतीष जोगदंड

चौसाळा — आज पर्यंत चौसाळा शहराची सूत्र धन दांडग्या, लबाडांच्या हातात राहिली त्यामुळे मागास गाव देखील विकासाच्या वाटेवर चालू लागली मात्र चौसाळा शहराचा विकास खूंटला गेला. गोरगरिबांना वाली राहिला नाही.त्यामुळे अन्यायाच पारड जड झालं. सत्य परेशान होऊ लागलं. यातून जनतेची सर्वसामान्यांची सुटका व्हावी यासाठी जनतेच्या मदतीने सत्तेसाठी नाहीतर जनतेच्या मदतीने सत्यासाठी एकाकी लढा उभारला असून नक्कीच सरपंच पदाच्या उमेदवार सौ सुलभा सतीष जोगदंड यांचा विजय होईल असा विश्वास सतीष जोगदंड यांनी व्यक्त केला आहे.

निवडणुकीत उभा राहण्याची इच्छा नसताना देखील राजकीय फायदा घेण्यासाठी धनदांडग्यांनी माझी फसवणूक केली. उमेदवारी अर्ज भरण्यास भाग पाडले. शेवटी आपल्याच पत्रावळीवर भात ओढून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शेवटी असत्याच्या जीवावर हे राजकारण करणार असतील फसवणार असतील तर सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे ही मंडळी सत्तेत आली तर किती अवघड करतील. सत्यानेच परेशान व्हायचं का? असा विचार मनात आला. अन् गोरगरीब जनतेला न्याय मिळण्यासाठी गोरगरिबांच्या सहकार्यानेच “सत्यासाठी लढा उभारला.लबाडांच्या हातात सत्ता जाऊ नये यासाठी निवडणुकीपूर्वी मा. जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्याशी झालेल्या बातचीतीची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल केली. त्यामुळे जनतेला खरच सत्य काय आहे हे लक्षात आलं. यापूर्वी अनेकांनी ग्रामपंचायत चा कारभार हाकत फक्त स्वतःची घर भरण्याचं काम केलं. गोरगरिबांना वाली राहिला नाही. त्यामुळे चौसाळा शहर विकासापासून कोसो दूर राहिलं. जनता या निवडणुकीत लबाड, धन दांडग्यांना धडा शिकवण्यासाठी एकवटली असून जनतेचे आशीर्वाद आम्हाला मिळू लागल्याचं सतीश जोगदंड यांनी “सह्याद्री माझा”शी बोलताना सांगितलं.
ध्यास परिवर्तनाचा, गावच्या सर्वांगीण विकासाचा” हे ब्रीद घेऊन धनशक्ती विरोधात “जनशक्तीचा” लढा उभा केला आहे. या जनशक्तीच्या लढ्याला मतदार भरभरून साथ देईल. “शिट्टी” या चिन्हाला मतदान करून सरपंच पदाच्या उमेदवार सौ सुलभा सतीष जोगदंड यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील असा विश्वास देखील सतीश जोगदंड यांनी व्यक्त केला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button