लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गर्भवती महिलेवर अत्याचार

बीड — शेवगाव पर्यंत लिफ्ट देतो असं सांगत गाडीत दोन विवाहित बहिणींना बसवून घेतले. त्यातील एका 25 वर्षीय गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याची घटना नांदूर फाटा ते अमळनेर रोड दरम्यान मंगळवार दि. 13 डिसेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घडली दरम्यान पीडीतेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात 14 डिसेंबर रोजी तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेवगाव येथून दोन विवाहित बहिणी आईला भेटण्यासाठी पाटोदा तालुक्यातील एका गावात आल्या होत्या. मंगळवार 13 डिसेंबर रोजी शेवगावला जाण्यासाठी डोंगरकिन्ही मार्गावरील नांदूर फाटा येथे वाहनाची वाट पाहत उभा राहिल्या. यावेळी गाडी आली
तुम्हाला शेवगावला सोडतो म्हणून चालकाने दोघींना वाहनात बसवले. यापूर्वीच गाडीत आणखी तिघेजण बसलेले होते. नांदूर फाट्यापासून गाडी काही अंतरावर गेल्यानंतर त्यातील एकाने दोन्ही बहिणी पैकी 25 वर्षीय गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर या दोघींना रस्त्यावर सोडून देऊन तिघेही फरार झाले. या घटनेची माहिती पीडितेने अंमळनेर पोलिसांना फोन करून दिली. पोलिसांनी लागलीच पिडीतेने सांगितलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर पिडीत महिलेला अंमळनेर आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणले. पुढील वैद्यकिय चाचणीसाठी पिडीतेस बीडच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास पिंक पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक राणी सानप करत आहेत.