महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 27 जुलैपासून अंतिम सुनावणी-मुख्य हस्तक्षेप याचीका कर्ता राजेंद्र दाते पाटील यांची माहीती

औरंगाबाद — मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेवर आणि पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात 27 जुलैपासून अंतिम सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणीसाठी तीन दिवसांचा वेळ निश्चित केला आहे.

व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही सुनावणी होणार आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष माणसांच्या उपस्थितीत ही सुनावणी होणं शक्य नसल्याचं कोर्टानं म्हटलंय.
पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य कोर्टाच्या या निर्णयावर अवलंबून आहे. त्यामुळे कोर्टानं याबाबत लवकर निर्णय देण्याची विनंती ज्येष्ठ वकील शाम दीवाण यांनी केली.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या अध्यक्षते खालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर 15 जुलै रोजी सुनावणी झाली.
दरम्यान सर्व पक्षांनी एकत्र बसून नेमकं कोण किती वेळ युक्तिवाद करणार आहे, तसंच तेच तेच मुद्दे परत येणार नाही याबाबत निर्णय घ्या, असं न्यायाधीश राव यांनी सांगितलं आहे.
याआधी 15 जुलै रोजी अंतरिम आदेश देऊ असं कोर्टनं म्हटलं होतं.महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरींत 13 टक्के आरक्षण आहे. या आरक्षणामुळे राज्यातील एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जात असल्यामुळे हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचीका कर्त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने हा खटला लढवण्यासाठी मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांची नियुक्ती यापूर्वी केलेली आहे. त्यांच्या सोबतच आता मुख्य हस्तक्षेप याचीका कर्ते यांचे वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे ही मराठा आरक्षणाची बाजू मांडणार आहेत.
आता सुप्रीम कोर्टात नेमकं काय सुरू आहे हे पहाणे महत्त्वाचे ठरत आहे.
मराठा आरक्षणाची वैधता आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षण या दोन विषयांसंबंधी सुप्रीम कोर्टात सध्या लढाई सुरू आहे.या मध्ये मुख्य हस्तक्षेप याचीका कर्ता मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांचे वतीने जेष्ठ वकील अनिल एस गोलेगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयात वकील सुधांशु चौधरी व इतर कामकाज पहात असुन त्यानी विविध न्याय निवाडे लेखी न्यायालयात दखल केलेली असुन पहिला विषय म्हणजे, मराठा आरक्षणाच्या वैधतेचा आहे कारण 1 डिसेंबर 2018 पासून महाराष्ट्रात सामाजीक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग एस ई बी सी अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण लागू झालं आहे. शिक्षणात 12 टक्के आणि नोकऱ्यांमध्ये 13 टक्के असं हे आरक्षणाचं प्रमाण आहे.
या आरक्षणाला वकील जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन या आरक्षणाच्या वैधतेवर प्रश्न निर्माण केला आहे.
दुसरा विषय म्हणजे, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण लागू करू नये, अशी मागणी करणारी याचीका सर्वोच्च न्यायालयात केलेली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची शेवटची तारीख 30 जुलै 2020 आहे. त्यामुळे या संबंधीच्या सुनावणीचं महत्त्वं अधीक वाढलेले आहे अशी माहीती आमच्या प्रतिनिधी सोबत बोलतांना मराठा समाजाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील मुख्य हस्तक्षेप याचीका कर्ता आणि मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी दिली असुन गेली 28 वर्षापासून ते मराठा आरक्षणाचे कार्य करीत आहे असुन सात जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात
सुनावणी झाल्यानंतर मराठा समाजा साठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी आज सर्वोच्च न्यायालयात या विधेयकाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही. राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावीपणे बाजू मांडली.”
ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारची बाजू मांडत आहेत. शिवाय, मुंबई हायकोर्टात ज्या वरिष्ठ वकिलांनी मराठा आरक्षणाचा निर्णय कायम राहण्यासाठी यशस्वी युक्तिवाद केला, तेच वरिष्ठ वकिल सुप्रीम कोर्टात सरकारची बाजू मांडत आहे.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 27 जुलैपासून अंतिम सुनावणी होणार असुन न्यायालयात सर्व संबधितानी 22 जुलै पर्यंत लेखी शॉर्ट नोट दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहीती आमच्या प्रतिनिधी सोबत बोलतांना मराठा समाजाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील मुख्य हस्तक्षेप याचीका कर्ता आणि मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी दिली आहे त्यांच्या बाजुने कामकाजात मुख्य हस्तक्षेप याचीकेत मराठा समाजाच्या बाजुने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल वकील सर्वोच्च न्यायालयात वकील सुधांशु चौधरी यानी कामकाज पाहीले.
मुकल रोहतगी,पी एस पटवालीया,विजयसिंह थोरात,अनिल साखरे,सचिन पाटील,सी यु सिंग, पी नर्सिम्हा,शिवाजीराव जाधव,
सुधांशु चौधरी,दिलीप तौर,संदीप देशमुख,प्रशांत केंजाळे,अमोल
करांडे ,अजीत वाघ या मान्य वरानी पाहीले.
जेष्ठ वकील अरविंद-दातार,प्रदिप संचेती, शाम दिवाण,गोपाल शंकर नारायण, शत्रूंजय भारद्वाज, योगेश कोलते,सिद्धार्थ भटनागर, राहुल आर्य, ऋषीकेश चितळे, आदित्या सिद्रा, बी ए मार्लापल्ले अनुराग मानकर, अश्विन-देशपांडे,सुबोध-धर्माधीकरी,पी नर्सिम्हा,सिन्दुरा व्ही एन एल,आदित्या त्रिपाठी,आरएफ़ तोतला,अभिषेक चौहान्ं,राहुल चिटणीस,अक्षय शिंदे,वैभव सुखदरे,सी यु सिंग,अमित तिवारी,आर्य मितजा,देवयानी गुप्ता,गुनरत्न सदावर्ते,पंकज कुमार सिंग,पवन कुमार शुक्ला,गोविंदजी,स्नेहा अय्यर,जगदीप शर्मा,महेश करांडे,देवदत्त कामत,अभिजीत पाटील,संदीप डेरे,पुजा थोरात, निशांत,एस बी तळेकर, माधवी अय्यान,विपिन नायर,पी बी सुरेश,आदित्या जाधव,कुरातुलेन, ब्रिजकुमार शा,निकोलास चौधरी,स्नेहल जाधव यांनी तर शिवाजीराव जाधव, सुधांशु चौधरी,पूजा धर,श्रीराम पिंगळे,ऋषीकुमार सिंह गौतम, भरती त्यागी,समीर मलिक, विवेक सिंग,विपिन नायर,राजा सिंग राणा,कृष्णकुमार सिंग, आशुतोष दुबे,रजत जोसेफ,राहुल जोशी,निशांत कातनेश्वरकर, राकेश शर्मा,फ़ारूक राशिद, नरेंद्रसिंह आदीनी जयश्री पाटील प्रकरणात सहभाग घेतला होता.
जयश्री लक्ष्मणराव पाटील या याचीका प्रकरणात राजेश टेकाळे,राजेंद्र दाते पाटील ,विनोद पाटील, दिलीप पाटील हे असुन विवेक कराडे,संदीप पोळ,विनोद पोखरकर,विलास सुद्रीक,प्रविण पाटील,बाळकृष्ण पाटील आदी सह राजेंद्र कोंढरे सुद्धा जयश्री पाटील प्रकरणात याचीका दाखल करणार असल्याचे कळते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close