महाराष्ट्र

दुबार मतदान करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा — बळवंत चव्हाण

बीड — लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांना इतर ठिकाणी मतदान करणारे मतदार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तिसऱ्याच ठिकाणी मतदान करत आहेत, व्यापार आणि नोकरीसाठी इतर ठिकाणी वास्तव्यास असलेले आणि त्याठिकाणच्या मतदार यादीत नाव असतानाही पुन्हा गावच्या निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या अशा दुबार मतदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बळवंत चव्हाण यांनी केली आहे. सुशिक्षित मतदारांना स्वतःची नावे दोन मतदार यादीत माहित असतानाही वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे निवडणुक आयोगाची फसवणुकच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बीड जिल्ह्यात सुमारे ७०४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी रविवार, दि.१८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या सुजान मतदारांना स्वतःचे नाव वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदार यादीत असल्याची माहिती असतानाही हे मतदार दर निवडणुकीत सोईप्रमाणे दुबार मतदानाचा हक्क बजावताना दिसतात, असे लोक खऱ्या अर्थाने लोकशाही व्यवस्थेला धोका असल्याचे प्रतिपादन करून दुबार मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बळवंत चव्हाण यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

अनेक मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये आढळून येत आहेत. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना हे मतदार इतरत्र मतदानाचा हक्क बजावून केवळ पैशाच्या मोहापायी गावातील कोणत्याही समस्यांची जाण नसताना हे लोक ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अनेक कर्मचारी व व्यापारी विशिष्ट कालावधीसाठी गावात वास्तव्यास आहेत, त्यांच्याकडे कायम रहिवाशी पुरावा नसतानाही हे लोक मतदानाचा हक्क वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी बजावताना दिसतात. अनेकांची दुबार नावे मतदार यादीत असतानाही असे लोक मतदानाचा हक्क बजावणार असतील तर त्यांच्या विरुध्द कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हे निवडणुक अधिकाऱ्यांनी दाखल करावेत अशी मागणी बळवंत चव्हाण यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणुक अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे दुबार मतदार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button