बीड जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या

बीड — औरंगाबाद परिक्षेत्रामधील पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत
पोलिस निरीक्षक सवर्गातील बीड जिल्ह्यातील रविंद्र गायकवाड उस्मानाबाद ला, शेषेराव उदार यांची औरंगाबाद ग्रामीण, भागवत फुंदे यांची जालना तर सिद्धार्थ माने यांची देखील जालना येथे बदली करण्यात आली आहे. औरंगाबाद येथून बालक कोळी तसेच जालना येथून वादग्रस्त पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांची बीड येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, लक्ष्मण केंद्रे, ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या औरंगाबाद ग्रामीण येथे बदली झाली आहे. याबरोबरच उपनिरीक्षक संवर्गातील लहुजी घोडे, विलास चव्हाण, रियाजुद्दीन शेख यांच्या औरंगाबाद ग्रामीण येथे तर वैशाली पेटकर यांची उस्मानाबादला बदली झाली आहे.औरंगाबादहून रंजीत कोसले, शैलेश जोगदंड आणि उस्मानाबादहून हिना कौसर शेख बीडला येणार आहेत.