चार वर्षाची पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार

नवी दिल्ली — चार वर्षाची पदवी पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना आता थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली आहे.
Students with four-year undergraduate degree can directly pursue Ph.D programmes: UGC chairman Jagadesh Kumar
— Press Trust of India (@PTI_News) December 14, 2022
चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्णतः अमलात येईपर्यंत तीन वर्षाचे पदवी पूर्व अभ्यासक्रम बंद केले जाणार असल्याचं पीटीआयने यूजीसी च्या हवाल्याने सांगितलं आहे
पदवीपूर्व शिक्षण तसेच संशोधन आणि पीएचडी अभ्यासक्रम अधिक सक्षम करण्यासाठी यूजीसी मार्गदर्शन तत्वे जाहीर करण्यची योजना आखत आहे.
पीएचडी प्रवेशासाठी पात्रता निकष बदलले?
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पीएचडी प्रवेशासाठी असलेले पात्रता निकष बदलण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार आता पदवीनंतर थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार आहे. त्यासाठी आता पदव्युत्तर पदवीची अट आवश्यकता राहणार नाही. मात्र, यासाठीही युजीसीकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना किमान 75 टक्के गुण किंवा समतुल्य सीजीपीए असल्यास थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार आहे.ज्यांनी चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमानंतर पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला आहे. त्यांनाही पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला पीएसडीसाठी प्रवेश मिळणार आहे. मात्र, तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांना 55 टक्के गुणांसह दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतरच पीएचडीसाठी प्रवेश मिळेल.