आपला जिल्हा

कोरोना वार्डात कर्तव्य बजावणाऱ्या परिचरिका प्रमिला शेळकेंचे जंगी स्वागत

        • पंचशील नगर मधील महिलांचे कौतुकास्पद काम 

बीड — शहरातील पंचशील नगर मधील प्रमिला शेळके या जिल्हा रुग्णालयात परिचारिका आहेत. त्यांनी तब्बल पंधरा दिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वार्डात रुग्णांवर उपचारासाठी कष्ट घेतले. कर्तव्य निभावून आपल्या घरी आलेल्या प्रमिला शेळके यांचे नगरातील महिलांनी जंगी स्वागत केले. आज कोरोना आजारापेक्षा रुग्णांना तिरस्काराच्या भावनेने बघितले जात असतांना या महिलांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. या रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात कोविड वार्डाची स्थापना करण्यात आलेली आहे. याठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी परिचरिकांची नियुक्ती केली जाते. शहरातील पंचशील नगर येथील प्रमिला मुरलीधर शेळके यांची 15 दिवसांपूर्वी या वार्डात नियुक्ती करण्यात आली होती. आपले कर्तव्य बजावून घरी आलेल्या प्रमिला शेळके यांचे पंचशील नगर मधील महिलांनी जंगी स्वागत केले. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून तसेच औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी साधना मस्के, आशा बोराडे, आवणी मस्के, अनुष्का मस्के, रूपा ताई विद्यागर, जयश्री डोंगरे, योगिता विद्यागार, स्वाती मस्के, लता बोराडे, रिना इनकर, हमिदा ताई, शैला मस्के, शीतल मस्के, यांच्यासह पंचशील नगर मधील मित्र परिवार उपस्थित होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close