आपला जिल्हा

आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम: गुरुवारी रक्तदान शिबिर

 

बीड — राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे साामजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज गुरूवार दि.16 जुलै रोजी सकाळी 10 वाजता महा रक्तदान शिबीराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस भवन बार्शी रोड बीड येथे करण्यात आले आहे. कोरोना संदर्भातील सोशल डिस्टन्सचे नियम पाळुन सर्वात श्रेष्ठ दान असलेल्या रक्तदान शिबीरात आपण रक्तदान करून सहभाग नोंदवावा असे आवाहन बीड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने बीड जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत विविध घटकातील गरजुवंतांना मदत करणे, वृक्षारोपण व रक्तदान शिबीरे आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. बीड विधानसभा क्षेत्रात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी भवन बार्शी रोड बीड येथे सोशल डिस्टंसचे नियम पाळून महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबीराचा प्रारंभ माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, अ‍ॅड.डी.बी.बागल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व ज्येष्ठ नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. या रक्तदान शिबीरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीडच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत शिबीर
ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन बार्शी रोड बीड येथे महारक्तदान शिबीर सकाळी 10 वाजता सुरू होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सोशल डिस्टंसचे नियम पाळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close