डीपीचे फ्युज टाकताना tiktok स्टार संतोष मुंडेसह अन्य एकाचा करंट लागून मृत्यू

्धारुर — टिक टॉक स्टार संतोष मुंडे सह बाबुराव मुंडे या दोघांचा करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोगलवाडी शिवारात मंगळवार दि.13 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली
टिक टॉक स्टार संतोष मुंडे आणि त्याचा पुतण्या बाबुराव मुंडे हे दोघे विद्युत रोहित्राचे फ्युज टाकण्यासाठी गेले होते. फ्युज टाकत असताना अचानक दोघांना विजेचा धक्का बसला. यात दोघांचाही मृत्यू झाला. या दोघांनाही तेलगाव येथे उपचारासाठी घेऊन जाण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संतोष मुंडे हा समाज माध्यमावर सक्रिय होता. विविध समस्या तो विनोदी शैलीतून मार्मिकपणे मांडत असे ग्रामीण बाज असल्यामुळे त्याला महाराष्ट्रातून फॉलोवर्सची संख्या मोठी होती. दरम्यान हसवणारा संतोष मुंडे सोडून गेल्याची घटना समजल्यानंतर भोगलवाडी सह त्याच्या चाहत्या मधून हळहळ व्यक्त केली जात आहे..