आष्टी – बाळेवाडी नंतर आता भवरवाडीत सहा लाखाचा गांजा जप्त

आष्टी — दोन-तीन दिवसांपूर्वीच बाळेवाडी शिवारात 70 किलो गांजा जप्त करण्यात आल्यानंतर भवरवाडी येथे कुक्कुटपालनाच्या शेडवर आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी छापा मारला. यावेळी तब्बल सहा लाखाचा गांजा जप्त करण्यात आला.
आष्टी तालुक्यातील बाळेवाडी शिवारात शुक्रवार दि.9 डिसेंबर रोजी कापसाच्या शेतात लागवड केलेला 70 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला होता.त्यानंतर भवरवाडी गावालगत असलेल्या एका कुक्कुटपालनच्या शेडमध्येही गांजा ठेवला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली सोमवार दि.12 डिसेंबर मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी पोलीस निरिक्षक चाऊस आष्टी पोलिसांचे पथक भवरवाडी शिवारात पाठवून कुक्कुटपालनच्या शेडवर छापा मारला. यावेळी पोलिसांना शेडच्या एका कोपऱ्यात ताडपत्री खाली ठेवलेल्या पोत्यांमध्ये पुड्यात लपविलेला अंदाजे 5 लाख 91 हजार 750 रुपये किमतीचा 59 किलो गांजा दिसून आला. पोलिसांनी सर्व गांजा जप्त करून शेतमालक हौसराव उर्फ पप्पू साहेबराव भवर रा. कडा, ता आष्टी याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक प्रमोद काळे यांच्या फिर्यादीवरून हौसराव पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये आष्टी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला.हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर आणि पोलीस निरिक्षक चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय देशमुख, एपीआय गोसावी, पीएसआय काळे, पोलीस कर्मचारी गर्जे, नाईकवाडे, नाईक, क्षीरसागर, वाणी, पठाण, पवळ यांनी पार पाडली.