क्राईम

गुन्हे शाखेच्या पथकाने माजलगाव मध्ये आठ लाखाचा गुटखा पकडला

माजलगावगढी – माजलगाव रस्त्यावर पाठलाग करत संभाजी चौकात गुटख्याची वाहतूक करणारे पिकअप वाहन ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. या कारवाई तब्बल आठ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
गढी — माजलगाव रस्त्यावरून पिकअप क्र. एम एच 44 — 9301 मधून गुटखा घेऊन जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. माजलगाव मधील संभाजी चौकात पोलिसांना पिक अप ताब्यात घेण्यात यश मिळाले पोलिसांनी तपासणी केली असता यात गुटखा आढळून आला. यामध्ये राजनिवास गुटखा 6 लाख58हजार944, जाफरानी जर्दा 1लाख 64 हजार736 रुपयांचा मिळून आला. गुटखा व गाडी असा एकूण 14 लाख 23 हजार 680 मुद्देमाल यावेळी जप्त केला गेला. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भारत राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक आनंद कांगणे यांच्या टीमने ही कारवाई केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close