आपला जिल्हा

एका फोनने शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये परत मिळाले; अन्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा -अँड. अजित देशमुख

बीड —  पिक कर्ज मुदतीत परत करावे लागते. मात्र कोरोना महाभारी मुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी मध्ये शेतकऱ्यांना अडचणी येत गेल्या. त्यामुळे पीक कर्ज मुदतीत परत करता आले नाही. बँकेने त्या शेतकऱ्या कडून व्याज म्हणून पंधरा हजार रुपये जादा भरून घेतले. मात्र अँड. देशमुख यांनी फोन केल्यानंतर बँकेला चूक लक्षात आली आणि बँकेने शेतकऱ्याला जास्तीचे घेतलेले पंधरा हजार रुपये परत केले असल्याची माहिती जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा पाटोदा येथे पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी गेला. त्याला मॅनेजरने सांगीतले की, आपल्याला पिक कर्ज भरण्यासाठी दोन दिवस उशीर झालेला आहे. त्यामुळे वीस हजार रुपये व्याज भरावे लागेल. शेतकऱ्याने हवालदिल होऊन अँड. देशमुख यांचे बरोबर फोनवर संपर्क साधला.
त्यानंतर देशमुख यांनी बँक प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ज्यादा घेतलेली व्याजाची रक्कम पंधरा हजार रुपये पुन्हा जमा करण्यात आली आहे. त्या शेतकऱ्याने जन आंदोलनाचे आभार मानले.
शेतकरी सध्या त्रस्त आहेत. त्यातच जादा भरून घेतलेले व्याजाचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याला किती व्याज आकारणी करण्यात आलेली आहे ? याबाबत आपआपल्या बँकेत खात्री करावी. ज्यादा व्याज भरून घेतले असेल तर ते परत घ्यावे. बँकांनी देखील शेतकऱ्यांची फसवणूक न करता ज्यादा भरून घेऊ नये. तसेच ज्या शेतकऱ्यांकडून जास्त व्याज आकारणी करून ती रक्कम वसूल करण्यात आलेली आहे, ती त्या – त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा जमा करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close