क्राईम

परळीत व्हीआयपी गाडीतून गुटखा वाहतूक करताना पकडला

परळी — शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून व्ही आय पी कारच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.कडक बंदोबस्त असताना पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुटखा तस्करीचे रॅकेट सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.

पोद्दार साहेब जिल्ह्यात परराज्यातून गुटखा आणून सर्रास विक्री केला जात आहे. पोलिसांकडून एखाद-दुसरी कारवाई होते. मात्र गुटखा तस्करीतले मोठे डॉन आपल्याच पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लागेबांधे  असल्यामुळे पकडले जात नाहीत. किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची तसदी घेतली जात नाही. हे चित्र बदलण्यासाठी व्यापक कारवाई करा

परळी शहर सध्या लाॅक डाऊन असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी चे पालन व्हावे यासाठी जागोजागी पोलिस पहारा देत असले तरी अवैद्य धंदे बिनबोभाट सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास व खाण्यास बंदी घालण्यात आली असली असली तरी विक्री मात्र जोरात सुरू आहे. आज नटराज रंग मंदिर परिसरातून एम एच — 44 एस–17 89 क्रमांकाची व्हीआयपी गाडी भरधाव वेगाने जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात जोरात आदळली. त्यामुळे चालकाचे संतुलन बिघडले गेले. यावेळी याठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या परळी शहर पोलीस ठाण्याच्या आरती जाधव यांनी कारला आडवले. गाडीची तपासणी केली असता यामध्ये गुटखा आढळून आला. यावेळी पोलिसांनी कार जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. याची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाला देण्यात आली. अन्न औषध विभागाच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close