क्राईम

बीड ग्रामीण पोलीसांनी फिल्मी स्टाईलने अट्टल दरोडेखोरांची टोळी पकडली

बीडबीड ग्रामीण पोलिसांनी जालना येथील दरोडे टाकण्याच्या तयारीत असलेली अट्टल दरोडेखोरांची टोळी माळापुरी शिवारात फिल्मी स्टाईलने गतीने हलचाली करीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास पकडली.

मंगळवारी पहाटे च्या सुमारास माळापुरी जवळ एका गाडीतून जात असलेले इसम दरोड्याच्या तयारीत असल्याचा संशय गस्तीवर असलेल्या सपोनि योगेश उबाळे यांना आला. मात्र त्यांच्यासोबत चालक कृष्णकांत बडे व एक होमगार्ड होता. यावेळी समय सूचकता दाखवत दरोडेखोरांच्या गाडी समोर गाडी उभा करत हेडलाईट चा प्रकाश चालकाच्या तोंडावर चमकवण्यात आला. दरोडेखोरांच्या टोळीच्या गाडी चालकाला काही लक्षात येण्यापूर्वीच सपोनि उबाळे यांनी गाडीच्या खाली उतरत दरोडेखोरांच्या कानशिलावर बंदूक ठेवली. यावेळी गाडीतील दोन दरोडेखोर जागे होते तर तीन दरोडेखोर झोपलेले होते. पोलिसांना पाचारण करत या दरोडेखोरांना ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखविण्यात आला. यावेळी त्यांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलो असल्याची कबुली दिली. या कारवाईत
किशोर शिवदास पवार (वय 24 रा.वडीगोद्री ता.अंबड जि.बीड), राम लक्ष्मण जाधव (वय 23 रा.उमापूर ता.गेवराई), दादा लाला जाधव (वय 20 रा.उमापूर ता.गेवराई), विजय ज्ञानदेव चांदणे (वय 24 रा.रामगांव ता.अंबड जि.जालना) व अन्य एका अल्पवयीन आरोपीचा यामध्ये समावेश आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीसात कलम 399, 402, 188, 269, 270 भादंवि 51 ब, आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक भास्करराव सावंत, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि.सुजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.योगेश उबाळे, चालक कृष्णाकांत बडे, होमगार्ड यांनी केली आहे.
सदरील चोरटे हे अट्टल दरोडेखोर आहेत. चारचाकीमध्ये फिरत फिरत जे दिसेल त्याची चोरी करत.यामध्ये त्यांनी आतापर्यंत विविध जिल्ह्यातून शेळ्या, बैल, इतर जनावरे, चारचाकी कार, शेतातील विद्यूत मोटार अशा अनेक ठिकाणी चोर्‍या केलेल्या असल्याची कुबूलीही पोलीसांना दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close