राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करा; आज बीड जिल्हा बंद

बीड — राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांबद्दल केलेल्या अक्षम्य विधानामुळे शिवप्रेमी मध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 12 डिसेंबर रोजी बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या विधानामुळे संतापाची लाट निर्माण झाली आहे. या सोबतच भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी मंगल प्रसाद लोढा रावसाहेब दानवे प्रसाद लाड यांनी देखील आक्षेपार्ह या सर्वांचा निषेध करण्यासाठी सोमवार दिनांक 12 डिसेंबर रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंद मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे. दरम्यान या बंदला व्यापारी महासंघासोबतच वंचित बहुजन आघाडी, एम आय एम, आम आदमी पार्टी यांच्यासह जवळपास सर्वच पक्षानी आपला पाठिंबा दिला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात भाजपचे वाचाळ वीर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान करून अस्थिरता निर्माण करण्यासोबतच जातीय विषमता पसरवण्याचे काम करू लागले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजां सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महापुरुषांबद्दल बरळणाऱ्या नेत्यांची हाकालपट्टी करावी व त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा बंदचे आयोजन करण्यात आले आहे.