आपला जिल्हा

परळी शहरात चार तर बीडमध्ये एक कोरोना रुग्ण सापडला

बीड — कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे परळी शहरातील चार महिलांना कोरोणाची बाधा झाली आहे. तर बीड शहरात एक रुग्ण सापडला आहे.

परळी शहरात एसबीआय बँक कर्मचारी संक्रमित झाल्यानंतर रुग्णसंख्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. 296 संशयित रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नसले तरी पाच जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये चार रुग्ण परळी शहरात सापडले आहेत. तर एक रुग्ण बीड शहरात सापडला आहे. परळी शहरातील आजाद नगर भागामध्ये कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे अठरा वर्षाच्या दोन मुलींना, वीस वर्षीय महिलेस तसेच तीस वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाली आहे. बीड शहरातील त्रिमूर्ती कॉलनी नंबर 3, दत्तनगर भागात गुजरातहून आलेल्या 54 वर्षे पुरुष कोरोना बाधित आढळला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close