आपला जिल्हा

कोरोना बाधित वृद्धाचा तर दोन संशयित रुग्णांचा मृत्यू

बीड — शहरातील थिगळे गल्ली जवळ असलेल्या औटी गल्लीतील कोरूना बाधित 78 वर्षीय रुग्णाचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.याबरोबरच स्वॅब घेतलेल्या 48 वर्षीय व्यक्तीचा देखील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे.

नांदूर घाट येथील 32 वर्षीय युवकाचा स्वाराती रुग्णालयात उपचार घेत असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला याच दरम्यान बीड येथे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 48 वर्षीय व्यक्तीचा देखील मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. अद्याप या दोघांच्याही अहवालाची प्रतीक्षा आहे. याबरोबरच औटी गल्लीत सापडलेल्या कोरोना संक्रमित 78 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना संक्रमित मृतांची संख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्याला अद्याप 296 स्वॅबच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close