पदवी मिळवण्यासाठी आता तीन वर्ष नाही तर चार वर्षे लागणार

नवी दिल्ली — भारतामध्ये अनेक शिक्षण शाखांतली पदवी मिळवण्यासाठी तीन वर्षांचा शिक्षणक्रमा नंतर विद्यार्थी पदवीधर होतो. 2020मधल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे (एनईपी) या शैक्षणिक रचनेत हळूहळू बदल होत आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रातल्या सर्व पदवी (UG) अभ्यासक्रमांचा कार्यकाळ चार वर्षांचा होणार आहे. राज्यातलं पुढचं शैक्षणिक वर्ष जून 2023मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. मंगळवार दि.6 डिसेंबर रोजी उशिरा प्रसिद्ध करण्यात आलेल्या ठरावात (जीआर) राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं यासंबंधी सर्व विद्यापीठांना नियमावली तयार करण्यास सांगितलं आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
एनईपीच्या अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाचे (एमयू) माजी प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालच्या राज्यस्तरीय समितीने आराखडा तयार केला आहे. या समितीने केलेल्या शिफारशीही राज्य शासनानं आपल्या जीआरमध्ये घेतल्या आहेत.