क्राईम

आष्टी तालुक्याच्या बाळेवाडीतील शेतात 70 किलो गांजाची झाड जप्त

बीड — कडा – नगर राष्ट्रीय महामार्गापासून आठ किलोमीटर अंतरावरील बाळेवाडी शिवारातील शेतात कापसाच्या पिकात 100 गांजाची झाडे आढळून आली. याप्रकरणी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखा व अंभोरा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सात लाख रुपये किमतीचा 70 किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास करण्यात आली.
आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथील हनुमंत अर्जुन पठारे याने स्वतःच्या शेतात कापसाच्या पिकात गांजाची लागवड झाडांची लागवड केली होती. याबाबत गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा बीड व अंभोरा पोलिसांना मिळाली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पोलिसांच्या संयुक्त कारवाई करत बाळेवाडी शिवारातील शेतात कपाशी पिकात 100 झाडे लावल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी एकूण सात लाख सात हजार रुपये किमतीचा 70 किलो 700 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला. याप्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या फिर्यादीवरून हनुमंत अर्जुन पठारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी पसार असून पुढील तपास अंभोरा पोलिस करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, अंभोरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने, एएसआय वचिष्ठ कांगणे, पोलिस नाईक अमोल ढवळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबुराव तांदळे, शिवदास केदार , प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, रामदास तांदळे, विकास वाघमारे, अतुल हराळ, अशोक कदम यांनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button