शिवाजीनगर नंतर सिरसाळा पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक शेळके लाच घेताना एसीबीने पकडला

बीड — बीडच्या पोलिस दलाला लाचखोरीच ग्रहण लागल असून दोन दिवसांपूर्वीच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक लाच घेताना पकडला. आज (दि 8) देखील सिरसाळा पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक प्रकाश शेळके दहा हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला.
यापूर्वीच्या पोलीस अधीक्षकांच्या काळात अनेकांना लागलेली लाचखोरीची सवय अजूनही जात नसल्याचं सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. सध्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर प्रामाणिक असले तरी त्यांनाही बदनाम करण्याचं काम अशी मंडळी करू लागली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना कडक पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण बहुतांश वेळा स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचा गैरवापर अशी लाचखोर अधिकारी मंडळी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षकासह अंमलदारास लाच घेताना औरंगाबादच्या एसीबी पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर या दोघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. या घटनेला दोन दिवसाचा काळ देखील उलटला नाही तोच सिरसाळ्यात एसीबीने दुसरी कारवाई केली. तक्रारदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजार रुपयाची लाच सिरसाळा पोलिस ठाण्याचा उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी मागितली. त्यापैकी दहा हजाराची लाच घेताना प्रकाश शेळके यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले ही कारवाई एसीबी चे उपाधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.