रावसाहेब दानवेंकडून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख; राज्यातील वातावरण तापले

औरंगाबाद — राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले.मात्र ही मालिका खंडित होण्याऐवजी ती वाढत आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे आणखी नव्या वादाला तोंड फुटले आहे.
. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दानवे यांनी महाराजां वरील वक्तव्याची चौकशी व्हायला हवी. वक्तव्य वादग्रस्त होईल की नाही हे तपासण्यात यावे असे म्हटले आहे. दरम्यान हे बोलताना त्यांनी महाराजांचा एकेरी शब्दात उल्लेख केला.
त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण पेटले. साताऱ्यात तर याचे जोरदार पडसाद दिसून आले. खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी दानवे यांच्या पुतळ्यावर राग काढला.रविवारी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पोवई नाक्यावरील शिवतीर्थाजवळ रावसाहेब दानवे,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप पक्षा विरोधात घोषणबाजी केली. तर मराठा संघटनांही याप्रकरणी आक्रमक झाल्या आहेत.
दरम्यान भाजपच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा कायम ठेवली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे.