आपला जिल्हा

कोरंटाईन केलेल्या 35 वर्षीय युवकाची कोरोनाच्या भीतीने आत्महत्या

गेवराईतालुक्यातील चकलांबा जवळील बाभळदरा तांडा येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात कोरंटाईन करण्यात आले होती. या व्यक्तीची कोविड टेस्ट साठी स्वॅब घेतला होता मात्र अहवाल येण्यापूर्वीच या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार रात्री घडली आहे.
गेवराई येथील कोविड सेंटर मध्ये तुकाराम जगन्नाथ जाधव वय 35 वर्षे राहणार बाभळदरा तांडा यास कोरंटाईन करण्यात आले होते.
शुक्रवारी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. या व्यक्तीचा अहवाल येणे बाकी आहे. मात्र त्यापूर्वीच त्याने कोरोणाच्या भीतीमुळे कोरंटाईन सेंटरमधील पंख्याला रुमाला च्या साह्याने फाशी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या जेवनाचा डब्बा घेऊन नप कर्मचारी आले त्यावेळी त्यांनी दरवाजा ठोठावून पाहिला मात्र बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळे बाजूच्या खिडकीतून आत मध्ये पाहिले असता ही व्यक्ती पंख्याला लटकलेली आढळून आली. घटनेची माहिती कर्मचार्‍यांने देताच गेवराई पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुरषोत्तम चोबे, फौजदार सुनील ऐटवार, विशाल प्रधान, राजू वाघमारे,आरोग्य विभागाचे डॉ.मुकेश कुचेरिया, तलाठी राजेश राठोड हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close