अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

माजलगाव — घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून पीडितेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 15 जुलै रोजी अल्पवयीन मुलगी घरात एकटी होती. घरी कोणी नसल्याचा फायदा उचलत आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश केला. सोबतच तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील केला. मात्र आरोपीने धमकावल्यामुळे मुलगी अत्याचार झाला तरी गप्प राहिली. परिणामी 30 जुलै पर्यंत आरोपीने सातत्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान पीडित मुलीच्या फिर्यादीवरून तीन डिसेंबर रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 376 (2)(एन)4,6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पिंक पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे करत असून आरोपी फरार झाला आहे.