आपला जिल्हा

जिल्ह्यात रुग्ण सापडले, बीडमध्ये 6, गेवराई माजलगाव परळी मध्ये प्रत्येकी एक

बीडआज जिल्ह्यातून विक्रमी 717 जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यामध्ये 286 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून 9जण कोरूना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले आहे. बीडमध्ये सर्वाधिक सहा परळीत एक, गेवराई आणि माजलगाव मध्ये प्रत्येकी एक जण सापडला आहे.
जिल्ह्यातून विक्रमी संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात झाल्यामुळे जिल्ह्याचे लक्ष या अहवालाकडे लागले आहे. आज 286 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 431 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत ‌ 269 जण निगेटिव आले असून 9 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. बीड शहरात सहा रुग्ण सापडले आहेत. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ भिवंडी येथून आलेली 32 वर्षीय महिला, मिलीया कॉलेज किल्ला मैदान याठिकाणी 75 वर्षे महिला, संभाजीनगर बालेपीर येथे 56 वर्षे पुरुष, अजीज पुरा खंदक येथे कोरूना पॉझिटिव रुग्णाच्या सहवासात आलेला 33 वर्षीय युवक, धानोरा रोड वरील राजीव नगर मध्ये 28 वर्षीय युवक तसेच बालाजी मंदिराजवळील पांडे गल्ली येथे30 वर्षीय युवक पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आला होता संक्रमित झाला आहे.परळी येथे एक रुग्ण सापडला असून आजादनगर मधील आहे एसबीआय बँक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेला 65 वर्षीय व्यक्ती आहे. गेवराई येथे मोमीनपुरा भागात पॉझिटिव रुग्णाच्या सहवासात आलेला 24 वर्षीय युवक संक्रमित आढळला आहे. तर माजलगाव मध्ये सांगलीहून आलेला जुना मोंढा भागातील 52 वर्षीय महिला कोरूना बाधित आढळून आली आहे ‌

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close