आरोग्य व शिक्षणक्राईम

दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक; औरंगाबादच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू

बीड — दोन मोटरसायकली समोर समोर धडकून झालेल्या अपघातात औरंगाबाद येथील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मोटर सायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मांजरसुंबा पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील जाधव वस्ती फाट्यावर रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली.


मांजरसुंबा पाटोदा महामार्गावर जाधववस्ती फाट्यावर दोन मोटार सायकलची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोराची होती की एम एच 23 बी 4232 क्रमांकाच्या मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. गणेश रामदास देवकर रा. नेहरूनगर(पुंडलिक नगर) औरंगाबाद वय 41 वर्ष असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर दुसऱ्या मोटरसायकलवर असलेली व्यक्ती गंभीर जखमी असून उपचारासाठी त्याला बीडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या जखमी इसमाच नाव समजू शकल नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button