आपला जिल्हा

” सह्याद्री माझा ” च्या बातमीनंतर पीक विम्यासाठी मी सुद्धा प्रयत्न केला असल्याचा खासदारांचा खुलासा

     ताई  कार्यकर्त्यांना आवरा
आमचे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब पत्रकारांनी एखादी बातमी विरोधात टाकली तर ‘ काय रे ‘ माझ्या विरोधात बातमी छापलीस ? बातमी मस्त लिहिली होती मला आवडली अशी दिलखुलास प्रतिक्रिया देत असत. त्यांच्या वारसदारांचे कार्यकर्ते मात्र पत्रकारांना स्पष्टीकरण मागत कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देतात.  मग जनतेच असलेलं मत पत्रकारांनी मांडायचं नाही का?  ताई अशा धमकी देणाऱ्या कार्यकर्त्यांना  आवरा हा आमच्या साहेबांचा वारसा नाही. मग जनतेच असलेलं मत पत्रकारांनी मांडायचं नाही का?
बीड — शेतकऱ्यांच्या पिकाला विमा संरक्षण मिळावे यासाठी आपण केंद्रीय कृषिमंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांचे लक्ष वेधून घेत. पाठपुरावा केल्यामुळे बीड जिल्ह्याला पिक विमा कंपनी नियुक्त करण्यात आली असल्याच खासदार महोदयांनी म्हटलं आहे. काल ” सह्याद्री माझा “ने जिल्ह्यातला शेतकरी व्हेंटिलेटरवर; दबंग खासदार कायमच्या रजेवर ? पिक विम्यासाठी काय केलं ? असे वृत्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रकाशित केलं होतं त्यानंतर त्यांनी हा खुलासा केला आहे.


बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे संरक्षण देण्यास विमा कंपन्यानी नकार दिल्या नंतर दबंग खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी २५ जून रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.खा.प्रितम मुंडे यांचे केंद्र सरकार दरबारी असलेले राजकीय वजन याकामी उपयोगी आले असून त्यांच्या दिल्लीत असलेल्या राजकीय वजनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या आरोग्याला देखील खा.मुंडे यांनी प्राधान्य दिले असून त्यांच्या प्रयत्नांनी बीड जिल्ह्याला ३८ व्हेंटिलेटर्स मिळाले आहेत.प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून मिळालेल्या व्हेंटिलेटर्समुळे कोरोना बाधित रुग्णांना जिल्ह्यातच सर्व आरोग्य सुविधा व परिपूर्ण उपचार मिळणार आहेत.पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून मिळालेल्या व्हेंटिलेटर्समुळे जिल्हावासीयांना पुन्हा एकदा खा.मुंडे यांच्या दिल्लीत असलेल्या वजनाची प्रचिती यानिमित्ताने आली असली तरी कुठल्याही प्रकारची जाहिरात किंवा पत्रकबाजी त्यांनी केली नाही.परंतु जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण या ओळींन प्रमाणे काही लोकांनी फुकटचे श्रेय घेण्यासाठी आयत्या पिठावर रेघोठ्या मारण्याचा प्रयत्न केला आहे.

नावाला साजेशी दबंग कामगिरी

कोरोनाचे संकट व खरीप पेरणीचा काळ असल्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांसमोर अनेक समस्या उद्भवल्या परंतु लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवत खा.मुंडे यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर दिला व जनतेच्या प्रत्येक समस्येचे निराकरण केले.ऊसतोड मजुरांचा प्रश्न,पीक कर्ज तसेच गोरगरिबांच्या राशन पर्यंतच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी खा.मुंडे यांनी घेतलेली कठोर भूमिका त्यांच्या “दबंगगिरीची”अनुभूती देते आहे.सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे निराकरण करत असताना जनतेने दिलेल्या नावाला साजेशी कामगिरी करून दबंग खासदार ही ओळख खा.प्रितम मुंडे यांनी सार्थ ठरवली आहे.म्हणूनच सर्वसामान्यांशी असलेला थेट संपर्क,जनतेचा विश्वास व पूर्वीच्या टर्ममध्ये केलेल्या विकास कामांच्या बळावर दुसऱ्यांदा भूषविलेले पद शोभेसाठी नसून लोकविश्वासाला सार्थकी लावण्यासाठी आहे हे खा.प्रितम मुंडे यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे अशी भावना जिल्ह्यातील नागरिक बोलून दाखवत आहेत असा खुलासा त्यांनी  ” सह्याद्री माझा ” कडे पाठवला आहे
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close