बेलेश्वर मंदिरातुन चोरी गेलेला पंचधातुचा मुकुट पोलीसांनी बेलेश्वर मठाधिपतींना सुपूर्द केला

बीड — तालुक्यातील बेलगाव येथील बेलेश्वर मंदिरातून चोरीला गेलेला पंचधातूचा मुकुट सापडला असून नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी आज संस्थानचे मठाधिपती ह भ प महादेव भारती महाराज व ह भ प तुकाराम भारती महाराज यांच्याकडे सुपूर्द केला.
बेलेश्वर मंदिरातील पंचधातूचा मुकुट व शेषनागाची मूर्ती 20 सप्टेंबर रोजी गाभाऱ्यातून पहाटेच्या वेळी चोरट्यांनी कुलूप तोडून नेली. याप्रकरणी मठाधिपती महादेव भारती गुरू संतराम भारती यांनी नेकनुर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार केली याप्रकरणी कलम 380, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच
अपर अधिक्षक कविता नेरकर ,उपअधिक्षक संतोष वाळके घटना स्थळी भेट दिली होती. दरम्यान बेलेश्वर संस्थान जागरूक असून कोणीतरी खोडसाळपणातून हा प्रकार केला असल्याची शंका मठाधिपती यांनी व्यक्त केली होती. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला मात्र आरोपी सापडला नाही. मंदिराच्या पाठीमागील भागात असलेल्या डोहात पाणी ओसरल्यानंतर एका शेतकऱ्याच्या दृष्टीस हा मुकुट पडला पोलीस पंचनामा करून जप्त करण्यात आलेली ही मुर्ती आज प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी मठाधिपतींच्या स्वाधीन केली या वेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.