आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात 20 रुग्ण सापडले: बीड 8, परळी 4, गेवराई 6, आष्टी 1, धारूर 1

बीडशुक्रवारी पाठवण्यात आलेल्या विक्रमी 293 संशयित रुग्णांचे स्वॅब मध्ये 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बीड मध्ये आठ ,परळीत चार, गेवराई सहा आष्टी व धारूर मध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. कोरोना महामारी जशी सुरू झाली तसे सर्वात अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
बीड जिल्ह्याला कोरोनाने आपल्या विळख्यात पकडले असून रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी 293 संशयितांचे अहवाल मध्यरात्री प्राप्त झाले. या अहवालात 273 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीडमध्ये आठ रुग्ण सापडले असून सात रुग्ण बीड शहरातील आहेत एक रुग्ण चौसाळा येथील आहे. बीडच्या संत तुकाराम नगर मध्ये 50 वर्षीय पुरुष, तुळजाई नगर मध्ये 30 वर्षीय युवक, घुमरे कॉम्प्लेक्समध्ये नऊ वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. परवाना नगर मध्ये 55 वर्षीय व 32 वर्षीय महिला संक्रमित झाली आहे. शाहूनगर भागातील अश्विनीला जवळ 24 वर्षीय व 25 वर्षीय युवक कोरोना बाधित आढळून आला आहे. तसेच चौसाळा येथे 43 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. गेवराई येथे सहा रुग्ण सापडले आहेत यामध्ये संजय नगर मध्ये कोरोना पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पंचवीस वर्षीय मुलाचा समावेश आहे. याबरोबरच इस्लामपुरा भागातील 38 वर्षीय महिला 22 वर्षीय महिला व 14 वर्षाची मुलगी संक्रमित झाली आहे. हे तिन्ही रुग्ण पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आले होते. मोमीन पुरा येथे 47 वर्षीय व 60 वर्षीय पुरुषास कोरोना ची बाधा झाली आहे.
परळी मध्ये चार रुग्ण सापडले असून विद्यानगर भागात 62 वर्षीय महिला व नाथ्रा येथे 46 वर्षीय पुरुष हे दोन्ही एसबीआय बँक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले होते. सिद्धार्थ नगर मध्ये 35 वर्षीय महिला व नाथ चित्रमंदिर जवळ असलेल्या गुरुकृपा नगर मध्ये 48 वर्षे पुरुष पॉझिटिव आले आहेत. आष्टी येथे दत्त मंदिर गल्लीत गुलबर्गा येथून आलेल्या 44 वर्षीय व्यक्तीस कोरोना ची बाधा झाली आहे. धारूर मध्ये देखील साठेनगर भागामध्ये पुण्याहून आलेला 42 वर्षाच्या इसमास कोरोनाची लागण झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close