आपला जिल्हा

परळीतील बँक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या 1500 लोकांचे स्वॅब घेण्यास सुरुवात

परळीयेथील एसबीआय बँकेतील कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. रुग्ण संख्या 19 वर जाऊन पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्थानिक प्रशासनाला आदेश देत. बँक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 1500 लोकांचे स्वॅब तपासण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
परळीतील एसबीआय बँक कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्यानंतर कोरुना रुग्णांची संख्या परळी शहरात वाढत आहे. प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून तात्काळ शहराच्या आसपासची खेडी बंद केली आहे परळी शहर देखील लाॅक डाऊन करण्यात आले आहे. आसे असले तरी रुग्ण संख्या वाढतांना दिसून येत आहे. आणखी संक्रमण झाले असण्याची शक्यता वर्तविली जात असून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, वैद्यकीय अधिकारी जी प सिईओ यांच्या बैठकीत बँकेच्या संपर्कात आलेल्या पंधराशे लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्याचे निश्चित करण्यात आले. यावरून आचार्य टाकळी, अस्वलांबा,बेल्मबा,बोधेगाव,चांदापुर,डाबी, दादाहरी वडगाव,दैठना घाट,लमान तांडा,दाऊतपुर, गोवर्धन खारी तांडा,हालम,हेलंब,इंडपवादी,इंजेगाव,जळगावतांडा,जिरेवादी,जायगावतांडा,कण्हेरवाडी,कण्हेरवाडीतांडा,कासारवाडी,कवडगाव घोडा,कवडगाव हुडा,कवडगाव साबला,कौठली,कावळ्याची वाडी,खामगाव,खोडवा सावरगाव,लाडझरी,लेंडेवाडी,लिंबुटा,लोणारवाडी,लोणी,मालेवाडी,मांडवखेल,मांडवा,मरळवाडी,मिरवट,मोहा,नागापूर,नागदरा,नागपिंप्री,नंदगौळ,नंदज, नाथरा,पांगरी,पिंपळगाव गाढे,रामेवाडी, कासारवाडी,रेवली,संगम,सरडगाव, सेलू,सेलू सबदराबद, सिरसाळा, सोनहिवरा,ताडोळी,टाळेगाव, तपोवन,टोकवाडी,वंजारवाडी, वाघबेट,वडखेल,वाघाळा,वानटाकळी, वानटाकळी तांडा तसेच परळी शहरातील जवळपास 1418 संशयितांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया दोन दिवस सुरू राहणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close