आपला जिल्हा

पिक विमा:जिल्ह्यातला शेतकरी व्हेंटिलेटरवर; दबंग खासदार कायमच्या रजेवर ?

बीडजिल्हा गेल्या चार पाच वर्षापासून कोरोना पेक्षाही महाभयंकर नैराश्येच्या गर्तेत अडकत शेतकरी आत्महत्येच्या महामारीतून जात आहे. दर एक दिवसाआड शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत असताना “दबंग ” खासदार, लोक नेत्याच्या वारसदार कोविड रुग्णांसाठी माझ्या पाठपुराव्यामुळे व्हेंटिलेटर मिळाले अशी दवंडी पिटत आहेत. किरकोळ महामारी साठी आपण पाठपुरावा केला पण शेतकऱ्यांना आत्महत्येच्या महामारीतून सोडवण्यासाठी पिकांना विमा संरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा केंद्राकडे का केला नाही असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जाऊ लागला आहे.

बीड जिल्ह्याच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर दुर्दैवाने केंद्राने मदत दिली तर ती माझ्यामुळे दिली. नाही दिली तर देणंघेणं नाही असं म्हणत “खासदार ” हे पद फक्त शोभेचच करून ठेवलं असल्याच चित्र दुर्दैवाने आज पर्यंत पाहायला मिळत आल आहे. कोरोना संकट काळ आल्यापासून बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी जनतेला दिलासा देण्याच एकही काम केलं नाही. साधं सोशल मीडियावर त्यांचं ट्विट सूद्धा पाहायला मिळाला नाही. एवढेच नाही तर अशा संकटाच्या काळात कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आधाराचा, शब्बासकीचा चकार शब्दही काढला नाही असं कार्यकर्ते मात्र म्हणत आहेत.ऊसतोड कामगारां पासून शहरी भागातील मजूर गरीब वर्गापर्यंत मदत पोहोचवावी यासाठी कुठलंच काम केलं नाही. भाजपच्या राजेंद्र मस्के सारख्या युवा नेत्यांनी मात्र जीवाचा रान करत कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता जेवढे जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र स्वतःला लोकप्रतिनिधी लोक नेत्याच्या वारसदार समजणाऱ्या लेकी मात्र आधाराची गरज असतानाच गायब झाल्या. काल केंद्राकडून जशी इतर ठिकाणी मदत केली गेली तशीच बीड जिल्ह्यासाठी व्हेंटिलेटरच्या माध्यमातून दिली गेली अन् तात्काळ याचं श्रेय घेत आपण कसे दबंग आहोत केंद्राला मदत मागितली की व्हेंटिलेटर दिले अशा बातम्यांची पत्रक वर्तमानपत्रातून झळकवली. ताई आम्ही मान्य करू तुमच्या पाठपुराव्यामुळे केंद्राने ही मदत दिली. शेतकरी सध्या आत्महत्येच्या महामारीतून जात आहे याची जाणीव आपल्याला का नाही? कोरोनामुळे चार महिन्यात जिल्ह्यात आतापर्यंत फक्त सात रुग्ण दगावले आहेत तर दुसरीकडे नैराश्येच्या महामारीमुळे सहा महिन्यात 82 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. एक दिवसा आड शेतकरी आत्महत्या करत आहे. येणाऱ्या काळामध्ये यात आणखी भर पडण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तविली जात आहे. अशावेळी शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण मिळावे यासाठी आपण प्रयत्न का केले नाहीत असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे. आपण प्रयत्न केला असेलच तर व्हेंटिलेटर तात्काळ केंद्रांने दिले मग विमा संरक्षणाच्या बाबतीतच आपल्या पाठपुराव्याला किंमत का दिली गेली नाही. की फक्त विनासायास एखादी गोष्ट आली कि ती माझ्यामुळे आली एवढेच सांगाण्यासाठीच खासदार पद असतं असे एक ना अनेक प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहे. दुष्काळामुळे होरपळलेला शेतकरी व्हेंटिलेटरवर आहे. अशा अवस्थेत पिक विम्याचे संरक्षण नाही मिळाली तर तो पूर्णपणे उध्वस्त होईल याचे श्रेय मात्र घ्यायला तयार रहा अशी उद्विग्नता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
जर आपल्या पाठपुराव्याला किंमत केंद्र सरकार देत नसेल तर दबंग पणा हा शब्द सार्थकी लावत बंड करून उठा नाहीतरी तुम्ही भाजपच्या जिवावर निवडून आलेल्या नाहीत तर आमच्या लोक नेत्याच्या लेक आहात वारसदार आहात म्हणून निवडून आला आहात. खासदार हे पद शोभेच न बनवता शेतकऱ्यांच्या विमा संरक्षणाचा प्रश्न संसदेत आणी संसदेबाहेर लावून धरा असा आता शेतकरी म्हणू लागला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close