ताज्या घडामोडी

कच्च्या तेलाचे दर 31 डॉलरनी घसरले!इंधन 14 रुपयांनी स्वस्त होणार?

नवी दिल्ली — आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 31 डॉलर्सनी घसरले आहेत. जानेवारीपासूनच हे दर उतरायला सुरुवात झाली होती; पण अगदी अलीकडे कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण ही जानेवारीपासूनची सर्वाधिक नीचांकी घसरण ठरली.

त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर 14 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.मार्चमध्ये कच्च्या तेलाचे दर बॅरलमागे 112.8 डॉलर होते. एक बॅरल (पिंप) म्हणजे 159 लिटर होय.आठ महिन्यांत कच्च्या तेलाच्या दरात बॅरलमागे तब्बल 31 डॉलरची म्हणजेच तब्बल 27.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही पेट्रोल, डिझेलचे दर घटण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, ही घसरण लिटरमागे 14 रुपयांची असू शकेल.
सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोल विक्रीवर नफा होत आहे; मात्र डिझेल विक्रीवर अजूनही लिटरमागे 4 रुपये तोटा होत आहे, असे काही दिवसांपूर्वी केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्पष्ट केले होते.. पुरी यांनी हे मत व्यक्त केले तेव्हा व तेव्हापासून डिझेलचे दर 90 रुपये लिटरच्या जवळपास आहेत.
मात्र, आता इथून पुढे ती परिस्थिती राहणार नाही. डिझेलचे दर दहा रुपयांनी कमी केले, तरी कंपन्यांना तोटा होणार नाही. महिनाभराने दिसतो परिणाम कच्च्या तेलाच्या दरातील घसरण तेल कंपन्यांना लिटरमागे 45 पैशांची बचत ‘एसएमसी ग्लोबल’च्या एका अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या दरात बॅरलमागे 1 डॉलरची घसरण झाली, तरी देशातील पेट्रोलियम कंपन्यांना रिफायनिंगमध्ये लिटरमागे 45 पैशांची बचत होते. हा 45 पैशांचा हिशेब लावला, तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या कच्च्या तेलातील दर घसरणीच्या हिशेबाने भारतातील किरकोळ बाजारात पेट्रोल, डिझेलचे दर लिटरमागे 14रुपयांनी कमी होणे तज्ज्ञांना अपेक्षित आहे.पुढेही सुरूच राहील. बॅरलमागे 70 डॉलरपर्यंत हे दर घसरतील. तेल आयातीपासून शुद्धीकरणापर्यंतचे एक चक्र हे 30 दिवसांचे असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर कमी झाल्यानंतरही त्याचे स्थानिक बाजारावर होणारे परिणाम दिसायला एक महिना तरी लागतो.
भारतात असे ठरतात पेट्रोल, डिझेलचे दर 19 ऑक्टोबर 2014 पासून पेट्रोल व डिझेलचे दर पेट्रोलियम कंपन्याच ठरवतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर विनिमय दर, कर, वाहतूक खर्च आदीही दर निश्चितीमागील मुख्य घटक असतात.
लोकसंख्येच्या दृष्टीने महाकाय चीनमधील कोरोनावरील निर्बंध सर्वात प्रमुख कारण. चीनच्या अनेक शहरांत लॉकडाऊन असल्याने तेलाची मागणी घटली आहे.रशियावर अमेरिकेसह युरोपीय देशांनी निर्बंध घातले असूनही आंतरराष्ट्रीय बाजारात रशियातून तेल येतच आहे. भारतही रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत आहे.
अमेरिकन फेडरलसह विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याज दर वाढविल्याने अर्थव्यवस्था थंडावली आहे. त्याचाही परिणाम मागणीवर झाला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button