आपला जिल्हा

बीडचा श्वास मोकळा: कोंबड्या खुराड्यातुन बाहेर पडाव्यात तशी गर्दी लोकांनी केली

बीड —  शहरात लागू असलेली संचारबंदी आता उठविण्यात आली आहे. ज्या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत या भागामध्ये पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बीड शहराने तब्बल आठ दिवसानंतर पुन्हा मोकळा श्वास घेतला आहे. संचारबंदी उठल्याचे समजताच लोकांनी कोंबड्या खुराड्यातुन बाहेर निघतात त्याप्रमाणे पुन्हा गर्दी केल्याचे चित्र सकाळी साडेसहा वाजता सुद्धा पाहायला मिळाले.
बीड शहरातील संचारबंदी लागू असलेल्या भागांमध्ये इंद्रप्रस्थ कॉलनी (शेख महमूद शेख मसूद यांच्या घरापासून ते शेख ताजोद्दीन यांच्या घरापर्यंत), आसेफनगर (सय्यद सिराजोद्दीन सय्यद खुदबुद्दीन यांच्या घरापासून ते शेख मतीन महंमद उस्मान यांच्या घरापर्यंत), बीड मामला (आयशा किराणा ते अब्दूल मुजीब अब्दूल वाहेब मोमीन यांच्या घरापर्यंत, औटी गल्ली (थिगळे गल्ली जवळ) (अखिलोद्दीन सरदार इनामदार यांच्या घरापासून ते विशाल विजयकुमार थिगळे यांच्या घरापर्यंत), पांडे गल्ली (बालाजी मंदिर जवळ)(गणेश मदनराव बलदवा यांच्या घरापासून ते बाबुराव माणिकराव धायगुडे यांच्या घरापर्यंत, डी.पी रोड बीएसएनएल ऑफिसजवळ (बारकूल हॉस्पिटल ते अदिनाथ नवले यांचे घर), परवाना नगर खंडेश्वरी रोड (महारुद्र नागनाथअप्पा माढेकर यांचे घर ते दत्त मंदिर पर्यंत), विद्या नगर पश्चिम (घुमरे कॉम्पलॅक्स), गोविंद नगर (बळीराजा कॉम्प्लेक्स ते गोपाळ आपर्टमेंट), मोमीनपुरा(सागर कटपीस सेंटर ते फातेमा बूक डेपो), राजुरीवेस ते कोतवाली वेस व आजुबाजुचा परिसर (कारंजा, अजिजपुरा, बलभीम चौक, छोटी राज गल्ली, काळेगल्ली, जुनाबाजार) याचा समावेश आहे हे भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close